जाऊदे .. लोक काय म्हणतील !!
( लहान असताना ७ वारांची कहाणी ऐकली होती तशी , मध्यमवर्गीय मराठी माणसा हि तुझी कहाणी तुलाच अर्पण )
· वय वर्षे २
कोणीतरी पाहुणे आले आहेत . कोणी तरी माझ्या साठी बनवलेला स्वेटर आणला आहे . त्या पाहुण्यांना तो दाखवण्यासाठी मला घातलाय तो स्वेटर . प्रचंड गरम होतंय पण केवळ कोणाचे तरी शिवणकाम दाखवण्यासाठी मला तो घालावा लागतोय . मी सांगू का कि काढा तो स्वेटर ? पण कसे सांगू मला तर बोलता येत नाही . रडू का ? पण जाऊदे लोक काय म्हणतील …
· वय वर्षे ८
आई बाबांनी तबल्याच्या क्लासला घातलाय . क्लास शाळा सुटल्यावर लगेच असतो . वर्गातील बाकीची मुले शाळा सुटल्यावर क्रिकेट खेळतात . मला पण त्यांच्या बरोबर क्रिकेट खेळायचे असते पण क्लास असतो . मला तबला नाही शिकायचा मला क्रिकेट खेळायचे आहे . घरी सांगू का ? नको जाऊदे . त्यांनी वर्षाची फी भरलीये . त्यांची इच्छा आहे घरात कोणाला तरी तबला वाजवता यावा ..जाऊदे जात राहतो क्लासला .. आई बाबा काय म्हणतील !!
· वय वर्षे १०
आज तबल्याच्या क्लासची परीक्षा .. मी ताल वाजवून दाखवले .. सगळे बरोबर .. मला certificate. घरचे खुश . पुढच्या महिन्यात next level दे म्हणत आहेत पण मला तबला नाही शिकायचा. या नवीन शाळेतली मुले शाळा सुटल्यावर Football खेळतात .. मला Football खेळायचा आहे ..जाऊदे ..देऊन टाकतो next level ..घरचे काय म्हणतील !!
· वय वर्षे १६
घरचे सगळ्याच विषयाला क्लास लाव म्हणत आहेत .. मला फक्त Eng , Maths and Science ला क्लास लावायचा आहे बाकी सगळे विषय मी घरी करू शकतो पण घरचे नको म्हणत आहेत …
अख्खा दिवस आणि शनिवार रविवार सुद्धा माझा क्लास मधेच जातोय . कधी एकदा हे वर्ष संपतंय असे झालंय … पण आत्ता तर फक्त ऑगस्ट चालूये … नको ते क्लासेस असे सांगू का घरी ?
पण नको रिस्क घ्यायला .. महत्वाचे वर्ष आहे .. आणि घरचे काय म्हणतील ? कमी मार्क्स पडले तर लोक काय म्हणतील !!
· वय वर्षे १८
वर्गात एक सुंदर मुलगी आहे .. तश्या बऱ्याच आहेत पण हि बेष्ट आहे .. Height excellent आहे ..आमच्या कॉलेजच्या basketball team मध्ये आहे .. तिच्याशी एकदा बोलायचे आहे .. फक्त तिला ‘All the Best’ द्यायचे आहे for board exam and for basketball tournament ..बोलू का ? पण नको वर्गातली मुले काय म्हणतील ? तिला चिडवतील का ? मला तिच्या नावाने चिडवतील का ? या सगळ्याचा अभ्यासावर परिणाम होईल का ?
परीक्षा जवळ येतीये .. परीक्षे नंतर प्रत्येक जण वेगळ्या वाटेने जाणार परत कधी भेटेल ते पण माहित नाही .. मला तर तिचे नाव पण माहित नाही . एकदा कॉलेज च्या cycle stand मध्ये भेटावे का ?
जाऊदे मुल काय म्हणतील !!
· वय वर्षे २०
कॉलेज
हे programming, coding वैताग आहे … मला हे नव्हते करायचे .. घरी सांगायला हवे होते कि काहीतरी हटके course करतो १२ वी नंतर पण आता वेळ गेलीये
माझ्या वर्गातली मुले मुली काय बिनडोक सारखे दिवसभर त्या computer मध्ये तोंड घालून बसतात .. काय प्रोग्राम करतात आणि काय प्रिंट्स काढतात देव जाणे .. मला त्यांना सांगायचे आहे कि अरे मित्रांनो side by side आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो .. बंद करा ते कोडींग चला जरा नाटकाला जाऊ , काही तरी वेगळं करू .. पण जाऊदे हे लोक काय म्हणतील ..आणि नाटकाचे घरी कळले तर घरचे काय म्हणतील !!
· वय वर्षे २२
कंपनी कॅन्टीन
वा !!! याहून सुंदर मुलगी आपण आत्तापर्यंत पहिली होती का ?? अशक्य
टीपीकल मराठी मुलगी आहे असे कळले . जास्त माहिती तिच्या प्रोजेक्ट मध्ये असलेल्या आपल्या मित्राकडून कळू शकते . काय करावे ? जाऊदे लास्ट Friday तर तिला एका मुलाबरोबर बाइक वर जाताना पहिले . Boy Friend असणार … विचार सोडून दिलेला बरा .. आपल्याला तिच्याशी बोलताना कोणी पहिले तर काय म्हणेल ? आणि ती स्वतः आपल्याला काय म्हणेल ?
Am I suitable?? जाऊदे लोक काय म्हणतील !!
· वय वर्षे २६
Enough यार आता काय हरकत आहे विचारायला ? चांगली ३ वर्ष झाली मैत्री आहे आपली ? यार तिला आपण आवडत नसतो तर कशाला इतके वर्ष contact ठेवला असता .. and seriously सगळ्या आवडी निवडी match होत आहेत कि …
काय करावे ? विचारू का direct ? का आधी घरी विचारू ?
चल यार विचारून टाकू …जास्तीत जास्त काय नाही म्हणेल ..ठीक्के .. I have to respect her decision … पण नंतर तिचे लग्न ठरले कि , यार मी विचारले असते तर …अशा विचाराने उगाच रडत तरी बसावे लागणार नाही
पण नको ..तिने तसा विचारच केला नसेल तर ? आहे ती मैत्री पण संपेल .. common friends ला कळले तर ते पण तोंडात शेण घालतील .. सगळच वातावरण खराब होईल …
जाऊदे ती काय म्हणेल आणि महत्वाचे म्हणजे लोक काय म्हणतील !!
· वय वर्षे ३२
खूप अवघड झालाय ठरवणे .. हा flat घेऊ कि तो
बायको म्हणतीये हा .. मला वाटतंय तो
दोन्ही चांगले आहेत पण केवळ २ amenities जास्त आहेत म्हणून ह्या flat ला ५ लाख जास्त !!!
लूट मार आहे हि सरळ सरळ .. पण बायकोला कोण सांगेल
जाऊदे यार ५ लाख चे लोन जास्त काढावे लागणार .. १३०० ने EMI वाढणार ..जाऊदे हाच flat बुक करू .. बायको आणि सासरचे परत टोमणे मारतील.
· वय वर्षे ४२
च्यायला आठव्या वर्षी का या मुलाला एवढी Gadgets लागतात ? आम्हाला नाही लागली कधी ..मान्य आहे कि जमाना बदलला .. Tech Savvy झाली आहेत पोरे पण तरी यार at least २ वर्ष तरी समीर ने हि Gadgets नाही वापरली पाहिजेत ..पण कोण सांगणार ..बायको परत एकदा तुम्ही 80’s मधेच आहात अजून असा टोमणा मारण्याची संधी सोडणार नाही ..जाऊदे आणुदेत ती Gadgets …परत तो काय म्हणेल !!
· वय वर्ष ५०
वीटलोय या नोकरीला ..अजून किती वर्ष !! काय अर्थ आहे या नोकरीला जिथे आपण फक्त आला दिवस , आला तास नुसता ढकलतोय .. एक एक तास एक एक वर्षासारखा वाटतोय … एक भन्नाट आयडीया आहे . घरासमोरच्या पुस्तकांच्या दुकानात opening आहे .. काम काय असणार नुसते counter वर बसायचे .. असे कितीसे लोक येतात हल्ली मराठी पुस्तक घायला !!
मारू का Resign ? सुटेल एकदाचा
पण नको .. मुलीचे लग्न व्हायचय ..तिच्या साठी स्थळ बघताना काय सांगणार कि मुलीचा बाप पुस्तके विकतो ? मुलाला त्याच्या social circle मध्ये आपली ओळख कळून देताना down market वाटेल ..
आणि हा लाख भर रुपये महिना पगार , एवढ्या हजारो सुख सोयी आणि दर २ वर्षाने मिळणारी परदेशवारी हि सगळी चैन बायको सोडू देईल ? वेड्यात काढेल.
लोकांना नाही कळणार कि ८०० रुपये महिना पगार असला तरी त्या दुकानात नव्या कोऱ्या पुस्तकांना होणारा स्पर्श , तो नवीन पुस्तकांचा वास मला किती आवडतो …
जाऊदे … या वयात नोकरी सोडून असला वेडेपणा केला तर समाज काय म्हणेल!!
· वय वर्षे ७०
सगळं चांगलंय या अमेरिकेत .. खरच सगळं चांगलंय
मुलगा सून करोडोत कमवतायेत, नातवा बरोबर रोज खेळता येतंय. महत्वाचे म्हणजे हि खुश आहे इथे . पण नाही आता इथे माझे मन रमत .. का ते नाही सांगू शकत .. २ वर्ष पटकन गेली पण आता दिवस जात नाहीयेत …
लहानपणी एक स्वप्न पहिले होते .. Retire झाल्यावर कोकणात वाडी, स्वतः झाडांना पाणी घालणार , रोज सकाळी समुद्राकाठी फेर फटका, आज ते स्वप्न का पूर्ण करता येत नाहीये ? पैसा तर प्रचंड आहे .. मुला कडे पण मागावा लागणार नाही माझ्याच पैश्यातून वाडी विकत घेता येईल .. वेळ म्हणाल तर २४ तास काहीच काम नाहीये ..मग प्रोब्लेम काय आहे ?
मुलगा परत भारतात जाऊ देईल ? नुसते भारतात नाही तर कोकणात …तो तर म्हणतोय कि मरेस्तोवर आता इथेच राहा … तसे असेल तर आजच मेलेलो बरे …
या काळात सुद्धा आई बाबांची काळजी घेणारा मुलगा आहे याचा आनंद वाटून घेऊ का या वयात सुद्धा स्वतःच्या मनासारखे जगता येत नाहीये, एक साधे स्वप्न पूर्ण करता येत नाहीये म्हणून उर बडवून घेऊ ?
· वय वर्षे ७८
स्वतःचे घर , स्वतःची माणसे , लहानपणापसून ओळखणारी माणसे …वा !! मस्त वाटतंय आता … १० वर्षानंतर घरी आलो …१० वर्ष इथे नव्हतो पण महत्वाचे म्हणजे ६८ वर्ष इथेच तर होतो !!
आता सुख ..खर सुख अनुभवायचे …. शाळेत असताना आजोबांवर एक निबंध लिहिला होता ..त्यात आजोबांच्या दिन-क्रमाचे वर्णन केले होते .. चला आता तसे जगण्यावाचून कोणी म्हणजे कोणी रोखू शकत नाही ….आज हि असती तर हिने पण रोखले नसते ..उलट या वयात एवढा सुखी पाहून आनंद झाला असता तिला . ठरले तर मग ….आता थांबणे नाही .. सोशल वर्क , वाचन , लिखाण , TV , क्रिकेट , सिनेमा , नाटक , कोकण , समुद्र , hotelling सगळं सगळं सगळं करायचं .. प्रत्येक क्षण न क्षण जगायचा …मागची ७८ वर्षे केवळ लोक काय म्हणतील याचा विचार करत आलो पण आता नाही .
· वय वर्षे ७८
अरे यार हे काय म्हणतायेत कि मी पूर्ण आयुष्य जगलो .. नाही ओ आत्ता तर कुठे मी खऱ्या अर्थाने जगायला लागलो होतो . …इतक्यात संपले ? ….इतके दिवस फक्त compromise होते …. या मला उचलणाऱ्या ४ लोकांना सांगू का कि अरे थांबा ..नाही रे मी नाहीच जगलो …जगायचे राहूनच गेले …जाऊदे आता सांगता येणार नाही आणि सांगितले तरी लोक काय म्हणतील !!
-kedarhirve

0 comments:
Post a Comment